गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यंदाचा जिजामाता पुरस्कार जाहीर

0

नागपूर : धर्म, संस्कृती, इतिहास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने ‘जिजामाता विद्वत् गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या 39 वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे चाळीसावे वर्ष असून यंदाचा पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार असल्याची माहिती शिवकथाकार तथा छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांनी दिली. हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जाणारा असून 1 लाख 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर उपस्थित होते. कोरोना परिस्थितीमुळे पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतूमाधवराव पगडी, गो. नी. दांडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलूरकर, पद्मविभूषण तथा महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पंडित महादेवशास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह 38 मान्यवरांना ‘जिजामाता विद्वत् गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 28-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here