सावर्डेत आजपासून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा चिपळूण सावर्डे येथील यंग बॉईज क्रिकेट क्लबच्यावतीने दि. १२ फेब्रुवारीपासून आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ झाला आहे. दि. १६ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ आ. शेखर निकम, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत उपस्थित झाला. या स्पर्धेत राज्यभरातील टेनिस बॉल क्रिकेट संघ सहभागी होणार असून स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन यंग बॉईज क्रिकेट क्लब, सावर्डेचे अध्यक्ष केतन पवार, उपाध्यक्ष सचिन पाकळे यांनी केले आहे.
