१९ फेब्रुवारी रोजी होणार कोकणातील पहिली टिक टॉक स्पर्धा

0

रत्नागिरी खबरदार आणि आपुलकी सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या कोकणातील पहिल्या टिक टॉक स्पर्धेचा कार्यक्रम दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संसारे उद्यान मारुती मंदिर येथे होणार असून सर्वांना प्रवेश विनामुल्य असणार आहे. याच कार्यक्रमात कराओके गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी देखील घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना एका दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असून याला मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी व युवक वर्गाने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here