..म्हणून सिद्धूंनी तडकाफडकी दिला राजीनामा, सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहितात की…

0

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना नारळ देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केल्यानंतर सुटकेच्या निश्वास टाकणाऱ्या काँग्रेसच हायकमांडची चिंता आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी वाढवली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, सिद्धूंनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याचा पत्रामधून त्यांची नाराजी उघड झाली आहे. पंजाबच्या भविष्याशी तडजोड करण्याची माझी इच्छा नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यामागच्या खऱ्या कारणाचा पत्रात उल्लेख केलेला नाही. मात्र नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्यामध्ये फारसे पटत नव्हते. तसेच चन्नी यांच्या काही निर्णयावर सिद्धू नाराज होते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात सिद्धू यांनी लिहिले की, तडजोडी केल्यामुळे माणसाचे चरित्र संपुष्टात येते. मी पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करू शकत नाही, त्यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन.

ही आहेत सिद्धूंच्या नाराजीची कारणे
– कॅबिनेटमध्ये ज्यापद्धतीने पोर्टफोलियोचे वाटप झाले त्यावर सिद्धू समाधानी नव्हते.
– नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आले, मात्र सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा याला विरोध होता.
– अमृतसर सुधार ट्रस्टचे लेटर चरणजित सिंग चन्नी यांच्याकडून देण्यात आले.खरंतर ते सिद्धू यांना द्यायचे होते.
– तसेच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही सिद्धू समाधानी नव्हते.

याबरोबरच अॅडव्होकेट जनरलच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात एका नावावर एकमत होत नव्हते. अखेर हायकमांडने हस्तक्षेप केल्यावर अमरप्रित सिंग देओल यांना अॅडव्होकेट जनरल नियुक्त केले गेले. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावरूनही चन्नी आणि सिद्धूंमध्ये मतभेद झाले होते. अखेरच यामध्येही चन्नी यांचेच पारडे जड ठरले आणि इक्बाल प्रीत सिंग सहोता हे डीजीपी बनले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 28-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here