अतिक्रमण हटाव पथक पुन्हा जोमात कार्यरत

0

नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीतील प्रशासकीय धावपळीमुळे थांबलेली रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसात फळांसह भाज्या आणि कपडे जप्त करण्यात आले. नगराध्यक्षपद पोटनिवडणुकीपूर्वी शहरात रस्ते अडवून बसणाऱ्या हातगाडीवाल्यांवर कारवाई सुरू झाली होती. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे अतिक्रमण हटाव पथक स्थापन करण्यात आहे. मालमत्ता विभागाचे नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. निवडणुकीच्या धावपळीत मोहीम थांबली होती. आता मात्र सोमवारपासून ही कारवाई सुरू झाली आहे. जयस्तंभ ते एसटी स्टॅण्ड परिसरात रहदारीला अडथळा करुन बसणाऱ्या विक्रेत्यांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. यातील कपडे दंड भरून विक्रेत्यांनी ताब्यात घेतले. फळे, भाजी मात्र बालगृहाला देण्यात आली. रस्ते मोकळे करून देण्यासाठी अतिक्रमण करून बसणाऱ्यांवर कारवाई करावी, असा ठरावही केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here