कोरोना व्हायरसच्या धसक्याने वृद्धाने केली आत्महत्या

0

कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आल्याने एका वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. बालकृष्णन असे त्या वृद्धाचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला ताप सर्दीचा त्रास होत होता. त्या तापाने ते इतके अशक्त झाले की त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना घऱी पाठविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मास्क घालून राहण्यास सांगितले होते. मास्क घालायला सांगितल्यामुळे बालकृष्णन यांनी कोरोनाचा धसका घेतला. शनिवारपासून त्यांनी कुटुंबीयांपासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांनी खाणंपिणं देखील सोडलं होतं. अखेर सोमवारी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here