रत्नागिरी : आपल्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे शिरगांव रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयातील मत्स्य प्रकिया तंत्रज्ञान विभाग व राष्ट्रीय मात्सिकी विकास मंडळ, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत, मौजे गवखडी, ता. रत्नागिरी येथे दि. २४/०९/२०२१ रोजी ‘मत्य उप-पदार्थ निर्मिती’ या विषयावर, तसेच, मौजे धाऊलवल्ली, ता, राजापूर येथे दि. २७/०९/२०२१ रोजी ‘माशांची हाताळणी व स्वचातेचे महत्व’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम घेण्यात आले. गावखडी येथे पार पडलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच, श्री. मुरलीधर तोडणकर, कांदळवन समिती अध्यक्ष श्रीम, कांचन आंब्रे, कांदळवन उपजिवीक्षा तज्ञ श्री. वैभव बोंबले, कांदळवन प्रकल्प समन्वयक चिन्मय दामले, ऋतुजा ठोंबरे, श्रुतीका लोखंडे, प्रणव बांदकर आणि मत्स्य महाविद्यालयाच्या, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आशिष माहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमास २५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. अजय देसाई यांनी कवचधारी माशांच्या कवचांपासून कायटीन, कायटोसन व ग्लुकोसामाईन इ. उप-पदार्थ निर्मिती व त्यांचे महत्व या विषयीची माहिती दिली. प्राध्यापक डॉ. दबीर पठाण यांनी कायटीन, कायटोसन निर्मिती व त्याचा वापर या विषयीची माहिती दिली. प्रा. डॉ. जयाप्पा कोळी यांनी कवचधारी माशांच्या कवचांपासून कायटीन व कायटोसन कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थांना दाखवले. धाऊलवल्ली, ता. राजापूर येथे पार पडलेल्या जागरूकता-प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कांदळवन समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत आपटे, मुख्याध्यापक श्री. प्रफुल्ल गोसावी, के. आनंदीबाई गोखले माध्यमिक शाळा, धाऊलवल्ली चे सदस्य श्री. आर. टी. दळवी व श्री. सुभाष गोखले, उपजिवीका तज्ञ श्री. वैभव बोंबले, कांदळवन प्रकल्प समन्वयक चिन्मय दामले, प्रणव बांदकर आणि मत्स्य महाविद्यालयाच्या, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आशिष माहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमास २५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रा. डॉ. अजय देसाई यांनी ‘माशांचे आहारातील महत्व’ या विषयीची माहिती प्रशिक्षणार्थीना दिली. प्रा. डॉ. जयाप्पा कोळी यांनी मासळी खराब का होते या विषयीची तर प्रा. श्रीकांत शारंगधर यांनी नौकेवरील स्वच्छता व मासळीची योग्य हाताळणी या विषयाची माहिती प्रशिक्षणार्थीना दिली. हे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे आणि मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. श्री. साईप्रासाद सावंत आणि सहाय्यक श्री. तळेकर यांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दुपारच्या जेवणाची पॅकेट देण्यात आले व कार्यक्रमाअंती मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 29-Sep-21
