मत्स्यसंपत्तीचे व्यवस्थापन आणि संरक्षणावर आज प्रशिक्षण

0

रत्नागिरी : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती मजबूत करणारा मत्स्यव्यवसाय आणि त्यातील कायदे, तसेच संरक्षित जलचर यांची ओळख करून देण्यासाठी तसेच कोकणातील सागरी मत्स्यसंपत्ती आणि जैवविविधतेचे संरक्षण या विषयातील गहनता, सद्यःस्थिती याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी आणि राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर रोजी मत्स्यसंपत्तीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्रातील मत्स्य साठेवत्यांची सद्य स्थिती, जलचरांच्या संरक्षित प्रजाती आणि त्यातील कायदे तसेच मत्स्यसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून, केवळ पंचवीसच प्रशिक्षणार्थी यात सहभागी होऊ शकतात. तरी इच्छुक व्यक्तींनी प्रशिक्षण समन्वयक, डॉ. रवींद्र पवार, प्राध्यापक, मत्स्य जीवशास्त्र विभाग किंवा डॉ. स्वप्नजा आ. मोहिते, प्राध्यापक व विभागप्रमुख, मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरीशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 29-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here