चिकनमध्ये कोरोना विषाणू असल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल केल्याने चालू पंधरवड्यात सुमारे 40 टक्क्यांनी ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात करोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत, असे केंद्रीय पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
