महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड

0

चिपळूण : रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. संघटनेच्या अध्यक्षांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. खा. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा भरवून कबड्डीला प्रोत्साहन दिले आहे. दोन वर्षांपूर्वी रोहा येथे राष्ट्रीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेऊन यशस्वी नियोजन करून स्पर्धा पार पाडल्या. या पार्श्वभूमीवर खा. तटकरे यांची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोकणातील कबड्डीपटूंना न्याय देण्यासाठी हे पद महत्त्वपूर्ण ठरणार असून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कबड्डीपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी देण्याबरोबरच राज्यस्तरावर उत्तम खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत, असे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा कबड्डी असोसिएशन, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कदम, आ. शेखर निकम व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 29-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here