रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने संपर्क युनिक फाउंडेशन, रत्नागिरीचा सन्मान

0

रत्नागिरी : सातत्याने सामाजिक भावनेतून गेली चार वर्षे सक्रिय असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक ठिकाणी सन्मान होत आहे. विशेषतः कोरोना काळात या संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक ही सर्वत्र होत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने झालेला सन्मान. प्रसिद्ध उद्योगपती आर डी सामंत यांच्या हस्ते या संस्थेचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, उपाध्यक्ष मुकेश गुंदेचा, सचिव युसुफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष निलेश नार्वेकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, संस्थेच्या कोऑर्डिनेटर सौ. निकीता कांबळे यांनी स्वीकारला. आपल्या मनोगतात शकील गवाणकर यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली व नगर परिषदेने आमच्या कामाची दखल घेत जो सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, रत्नागिरी नगर परिषद चे सर्व नगरसेवक, शहरातील संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 29-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here