पादचाऱ्यास धडक दिल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल

0

हातखंबा: बेदरकारपणे गाडी चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वृध्द पादचाऱ्यास धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हातखंबा थिठ्याजवळील बस स्टॉपजवळ घडली. यात धर्मा गंगाराम खापरे (८२, रा. करबुडे, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी धर्मा खापरे हे रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील बस थांब्याजवळ उभे होते. त्याच सुमारास एका अज्ञात गाडीने त्यांना धडक देत घटनास्थळाहून पळ काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here