खंडणीची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0

फोन करुन ५ लाख रुपये खंडणी दे नाहीतर तुझ्या किंवा तुझ्या घरातील नातेवाईकांच्या जीवाला धोका निर्माण करु, अशी धमकी दिल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार १० फेब्रुवारी रोजी कोकणनगर येथे दुपारी २ ते २.३० वाजता कालावधीत घडली. या बाबत मुदस्सर लियाकत डिंगणकर (३८, रा. अजमेरी नगर कोकणनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here