होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे. होळी कोकणात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळीसाठी चाकरमानी आवर्जून आपल्या गावी जातो. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्याचे बुकींग १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कोकणात जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनल, पनवेल येथून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. होळीत गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकवेळा आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांना होळीसाठी गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.
