खेडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या ४० जणांवर दंडात्मक कारवाई

0

खेड : शहरात वाहतूक नियमांचे पालन न करता बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात येथील पोलिसांनी कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राबवण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ४० वाहनचालकांसह विनामास्क फिरणाऱ्या ५ जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या धूमस्टाईल स्वारांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड-भरणे मार्गावर, महाडनाका व जगबुडी नदीकिनारी भोस्ते पुलाजवळ मोक्याच्या ठिकाणी धडक कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. विनापरवाना वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या ४० वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. या शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवलत मिळाल्यानंतर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. यावेळी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत वाहतूक पोलिस नंदकुमार घाणेकर आदींचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here