राजापूर पोलिसांनी चार तासांत लावला घरफोडीचा छडा

0

राजापूर : तालुक्यातील तुळसवडे गावकरवाडी येथे झालेल्या घरफोडीचा राजापूर पोलिसांनी चार तासांच्या आत छडा लावत आरोपीला गजाआड केले आहे. या प्रकरणात सीताराम ऊर्फ राजू आडिवरेकर (२६ रा. तुळसवडे) याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळसवडे, गावकरवाडी येथील मंगला वसंत आडिवरेकर या दि.२२ सप्टेंबर रोजी आपल्या आजारी पतीला घेऊन विरार येथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दि.२६ रोजी त्या मुंबईहून घरी परतल्या त्यावेळी त्यांना घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कडी तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सोमवारी रायपाटण पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. घर बंद असताना अज्ञात चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने कुलूप व कडी तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाट फोडून घड्याळ व बॅटरी असा सुमारे ९०० रुपयांचा माल लंपास केला होता. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल के. आर. तळेकर, पोलिस नाईक वीर, पोलिस कॉन्स्टेबल कात्रे व कोळी यांनी तपास करीत चार तासांतच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सीताराम आडिवरेकर याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here