काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

0

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here