जुगारप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील बेलबाग येथे बेकायदा जुगार चालवणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री ८.२० वा. करण्यात आली असून, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा ५७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नसीमा सज्जाद शेख (रा. धनजीनाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस कॉन्स्टेबल मृणाली लिंगायत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांना बेलबाग येथील पांगारकर यांच्या घराजवळ बेकायदेशिरपणे जुगार चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून, अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:18 PM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here