मिरजोळे: जिल्हा नियोजनामधून बांधणार संरक्षक भीत

0

रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये मिरजोळे मधलीवाडी वाडकरवाडी दरम्यान नदीकिनारी असणाऱ्या खालचापाट परिसरातील शेतजमीनचे भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात भूस्खनलावर उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे विभागाने १ कोटी ३५ लाख रुपयांचा संरक्षण भिंतीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे यांनी सांगितले.गेली दहा-बारा वर्ष सातत्याने या भागात भुस्खलन होऊन शेतजमिनीचे नुकसान होत आहे. यापूर्वी या भागात एक संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यानंतर या भागातील भूस्खलन काही वर्ष थांबले होते. मात्र, गेली दोन वर्ष सातत्याने भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत सतरा एकरपेक्षा जास्त शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने या परिसरात मोठे भूस्खलन झाले. सुमारे १५० फूट लांब तर १५-२० फूट खोल जमीन खचली. या भूस्खलनामुळे तेथील शेतीबरोबरच भविष्यात लोकवस्तीलाही धोका संभवणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. __या भागातील नदीच्या प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.भूवैज्ञानिकांकडून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रशासनस्तरावरून उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू झाली आहे. पाटबंधारे विभागस्तरावरून येथील भुस्खलन रोखण्यासाठी १ कोटी ३५ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे पाठवण्यात आला होता. गतवर्षी झालेल्या भूस्खलनानंतरही प्रशासनाकडून येथील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू झाली. मात्र, नियोजन विभागाकडे आवश्यक निधीची कमतरता असल्याने हा प्रश्न तसाच राहिला होता. मात्र आता पूर उपाययोजना निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार आहे. त्याबवात जिल्हा नियोजनकडे पस्ताव पाप्त झालेला आहे. हा प्रस्ताव तातडीने पालकमंत्र्यांची मंजुरी घेतली जाणार आहे. मंजुरी मिळताच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पावसाळ्यानंतर भुस्खलनावर आवश्यक कार्यवाही सुरू होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जुंजारे यांनी सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here