एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटनसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज कोल्हापुरात येत आहेत. तसेच एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार राष्ट्रवादीच्या प्रमुख १५० कार्यकर्त्यांशी हॉटेल रेसिडेन्सी क्लब येथे संवाद साधणार आहेत. यासाठी अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नेते त्याठिकाणी उपस्थित असणार आहे. यानंतर गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता पवार कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. तर नंतर हॉटेल पंचशील येथे काही काळ विश्रांती घेणार आहेत. आणि यानंतर एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत देशभर गाजत असलेल्या एनआरसी व सीएए या विषयावर संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना रेसिडेन्सी क्लब येथे राष्ट्रवादीकडून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढे पवार येथून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता साताऱ्याकडे रवाना होणार आहेत.
