तो तुमचा काय होणार?; ‘हल्ला बोल’ टास्क दरम्यान स्नेहा आविष्कारमध्ये पेटला वाद

0

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय असणारा रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी. नुकताच या शोचा तिसरा सीजन सुरूही झालाय आणि यासोबत भांडणांना उधाणसुद्धा आलय. या सिजनमधील स्पर्धक नेहमीप्रमाणेच एकापेक्षा एक आहेत. या स्पर्धकांनी घरात प्रवेश करुन दोन आठवडे झाले फक्त आणि यांचे खरे डाव रंगूदेखील लागले आहे. आता एक एक असे टास्क येत आहेत कि ते खेळण्यासोबतच प्रत्येक स्पर्धकाचा खरा चेहरा आणि खरे रंग बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे या घरात आता दोन गटसुद्धा पडल्याचे दिसत आहे. त्यातच घरातील सदस्यांनी ‘हल्लाबोल’ हे नवीन कार्य फारच मनावर घेतल आणि आणखी ऐक वाद चांगलाच उफाळला. हा टास्क सुरु असताना स्नेहाने आविष्कारला असा सणसणीत टोला लगावला कि बस्स पाहणारे आणि ऐकणारे थक्कच झाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या हल्लाबोल हे कार्य सुरु असून यात दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात पहिल्या खेळात सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील मोटर बाईकवर बसून त्यांनी या खेळाला जोडीच्या रूपात सुरुवात केली. त्यानंतर विकास आणि विशाल या खेळात सहभागी झाले आणि या खेळाला आणखीच रंगत आली. त्यांनी या बाईकवरुन उठावे म्हणून समोरील टीममधल्या प्रत्येक स्पर्धकाने इतके प्रयत्न केले कि अक्षरशः जी जान लगावून. हे सर्व सचोटीने प्रयत्न तुम्ही बिग बॉसच्या या तंगड्या एपिसोडम्ह्ये पाहू शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here