ब्रेकिंग : रत्नागिरी पोलिसांनी केला गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

दीड लाखांचा गांजा करण्यात आला हस्तगत

रत्नागिरी : रत्नागिरी गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे तब्बल 1 लाख 42 हजार रुपये किमतीचा आठ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईत तिघांना जेरबंद केले आहे विशेष म्हणजे त्यातील एकाच्या कोल्हापूर येथून मुसक्या आवळल्या आहेत. माहितीच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी गांजा तस्कर यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली रत्नागिरीत किरकोळ गांजा विक्री करणाऱ्यासह गांजा सप्लाय करणाऱ्यालाच उचलण्याचा प्लॅन पोलिसांनी केला होता. त्यानुसार रत्नागिरीतील भाडे परिसरात राहणारा रुहान नामक तरुणाला गांजाची विक्री करताना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले होते आणि त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. रुहान याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी गांजा सप्लाय ज्या वाहनातून होत आहे त्याची माहिती काढली आणि पोलिसांनी नाका-बंदी सुरू केली. कोल्हापूर रत्नागिरी या एसटी बस मधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेल्वे स्टेशन फाट्यानजीक नाकाबंदी सुरू केली होती आणि पहाटेच्या सुमारास बस त्या ठिकाणी आली पोलिसांच्या कारवाईला पुन्हा सुरुवात झाली. ही बस रेल्वे स्टेशन फाट्यानजीक थांबल्यानंतर पोलिसांनी बस कि झडती घेतली त्यावेळी बस मध्ये असम चंद्रकांत जीत गये राहणार संगमनगर हातकणंगले या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे आठ किलो 941 ग्रॅम गांजा मिळून आला या गांजाची किंमत अंदाजे एक लाख 42 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गांजा विरुद्ध केलेल्या कारवाई शहर पोलिसांनी रूहान नामक तरुणांसह विनोद कर्ले,असम जिदये यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८(क)२०(ब)π(ब),२९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय जाधव करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
08:35 PM 30/Sep/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here