रत्नदुर्ग किल्ल्यावर नवरात्र उत्सवानिमित्त पर्यटकांना सुविधा पुरविण्याची मागणी

0

रत्नागिरी : नवरात्र उत्सवानिमित्त रत्नदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी मोठी यात्रा भरते. कोरोनामुळे गतवर्षी यात्रा बंद होती. यंदा मात्र पूर्वीप्रमाणेच यात्रा भरणार आहे. सद्य:स्थितील किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर झाडी, झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. पाण्याचे नवीन पाईप टाकण्याच्या कामामुळे रस्तेही खोदून ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर नादुरुस्त वीज खांबांमुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक, भाविक यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. याकडे लक्ष देऊन सुधारणा कराव्यात, अशा आशयाचे निवेदन भाजप कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 01-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here