ग्रृप ग्रामपंचायत कर्ला/जुवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अॅड. सुजित कीर यांची निवड

0

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रृप ग्रामपंचायत कर्ला/जुवे महात्मा गांधी तंटामुक्त गावसमितीच्या अध्यक्षपदी कर्ला /जुवे गावचे प्रतिष्ठीत नागरीक तसेच कायद्याचा व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेञाचा अनुभव असलेले अॅड. सुजित शिवाजी कीर यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. कर्ला गाव हा संमिश्र लोकवस्तीचा गाव आहे. हिंदू मुस्लिम येथे गुण्या गोविंदाने रहातात. कोव्हीडच्या सर्व नियमांचे पालन करून सरकारच्या आदेशाप्रमाणे काल झालेल्या ग्रामसभेत दोन्ही समाजातील ग्रामस्थांनी एकमुखाने अॅड. सुजित कीर यांची अध्यक्ष म्हणुन निवड केली. अॅड. सुजित कीर हे गेली 7 वर्ष याच समितीवर वकीलांचा प्रतिनीधी म्हणुन काम पहात आहेत. तसेच कर्ला विविध विकास सोसायटीचे चेअरमन म्हणुन 9 वर्ष त्यांनी काम पाहीले आहे. तसेच महाराजा फौडेंशन या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत व GJ 95 या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्या निवडीचे कर्ला सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रा.पं.कर्मचारी, माजी सरपंच श्री.महेंद्र चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख श्री.अनुराग झापडेकर, ग्रा.सदस्य श्री मिलींद हातफले, श्री अमित चव्हाण, सौ.नेहा कीर यांनी अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 01-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here