अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सार्वजनिकरित्या पक्षाला त्याचबरोबर सरकारला गोत्यात आणणारी वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, नवाब मलिक, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचं सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी या सूचना दिल्याचं बोललं जातंय.
