मदत ग्रुपच्या रक्तदान शिबिराला गणपतीपुळे येथे प्रतिसाद

0

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिराच्या सभागृहात मदत ग्रुपने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये आणि गावचे खोत श्री. भिडे यांनी देवीला प्रार्थना करून शिबिराला सुरुवात केली. शिबिरासाठी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालय रक्तपेढीची मदत झाली. शिबिरात मदत ग्रुपच्या हाकेला साथ देत ७६ दात्यांनी रक्तदान केले. मदत ग्रुप हा गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रुप असून आपत्कालीन परिस्थितीत सर्वांना शक्य असेल ती मदत करत असतो. ग्रुपचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्य राज देवरूखकर यांनी रक्तदान शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ग्रुपतर्फे असे सामाजिक कार्यक्रम हाती घ्यायचे आणि ते पूर्णत्वास न्यायचे, असा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 01-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here