रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दीपक नागवेकर यांनी भेट घेत निवेदन सदर केले. प्रत्येक तालुक्यात शिक्षकांच्या COVID-19 व आपत्कालीन कामासाठी ड्युट्या आहेत. जि. प. शाळा सुरू होत असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द कराव्यात अशी विनंती यावेळी केली असता संपूर्ण आढावा घेऊन अत्यावश्यक तेवढ्याच ड्युट्या ठेवण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्याशी यावर चर्चा करू असेही निवासी जिल्हाधिकारी खांडेकर यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 02-Oct-21