संघाच्या दुखापतींच्या सत्रामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या सलामीसाठी साशंकता

0

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नसल्यानं कसोटी मालिकेत सलामीला येण्याची संधी कोणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गील यांच्यात दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भारतीय संघानं मागील सात कसोटी सामन्यांत विजय मिळवले आहेत. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया 360 गुणांसह सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियाचं मनोबल नक्कीच उंचावलेलं असेल. पण, दुखापतींचे सत्र संघाच्या मागे कायम असल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान द्यावं, असा पेच निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here