कोकणवासीयांना पंचतारांकित दर्जाच्या सुविधा देणाऱ्या ”साई रिसॉर्ट”चे अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन होणार

0

खेड : मुंबईतील पंचतारांकित रिसॉर्टला मागे टाकू शकेल, अशा आलिशान सोयीसुविधांनी सुसज्ज अशा साई रिसॉर्टचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि.१४) होणार आहे. खेडच्याच नव्हे कोकणच्या शिरपेचात हा शोभिवंत तुरा ठरणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योगपती सदानंद तथा अप्पा कदम यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या भव्य वातानुकूलित रिसॉर्टमुळे कोकणच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे कोकणातील हे पहिलं रिसॉर्ट ठरेल, अशी माहिती हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धरिया यांनी दिली. खेड भरणे येथे हे रिसॉर्ट उभारले आहे. लग्न समारंभासाठी अद्ययावत असा कोकणातील पहिला वातानुकूलित बॅक्वेट हॉल, निवासासाठी सुट, सुपर डिलक्स रुम, स्विमिंग पूलसहित पार्टी, इतर लग्न सोहळ्यासाठीचे हिरवेगार लॉन हे या साई रिसॉर्टचे वैशिष्ट्य आहे. तसेच कोकणातील सगळ्यात मोठा कृत्रिम धबधबा हे या रेस्टारंटचे वैशिष्ट्य ठरणार आहे. कोकणवासीयांना पंचतारांकित दर्जाच्या सुविधा देणारे पहिले क्बल हाऊस, या साई रिसॉर्टमुळे मिळणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here