“शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, कामाला लागा”

0

पुणे: गेल्या काही दिवसांपासून आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पंतप्रधानपदी तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचे आहे, अशी मोठी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात वक्तव केले आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार आणि लढाऊ वृत्ती आपण दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी यावेळी उपस्थितांना केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 02-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here