शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीची करणारा कायदा आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात मंजुरीसाठी आणला जाणार असल्याची माहिती भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. राज्यातील जवळपास २५ हजार शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. अशा शाळांमधूनही मराठीचे धडे दिले जावेत, यासाठी राज्य सरकार कायदा आणणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
