कापसाळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने घेतली हरकत

0

चिपळूण : सध्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणावरून सर्वत्र ओरड होत असतानाच कापसाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने हरकत दाखल केली आहे. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ६२ वर्षांत अनुसूचित जाती-जमातीला येथे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here