रोमानियामध्ये कोरोना रुग्णालयातील आगीत 7 रुग्णांचा होरपळून मृत्यू

0

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना रोमानियामध्ये घडली आहे. कोरोना रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सात रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रोमानियाच्या कोन्स्तांता शहरातील एका रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये अचानक आग लागली. रोमानियाचे गृहमंत्री लुसियन बोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चुकून नऊ जणांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं पण यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात 113 रुग्णांवर उपचार सुरू असताना ही आग लागली. त्यानंतर सर्व रुग्णांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रपती क्लाउस इओहानिस यांनी आरोग्य यंत्रणेवर कोरोना महामारीमुळे खूप ताण आला आहे. तसेच लोकांचं रक्षण करण्यातही अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 02-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here