नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आज बैठक

0

रत्नागिरी : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे बैठक घेण्यात येणार आहे. यात शहर पोलिस ठाणे हद्दीतील नवरात्र उत्सव साजरी करणारी देवस्थाने, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, डीजे, बेंजो, डॉल्बी, स्पीकर, व्यावसायिकांची बैठक होणार आहे. पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक हे नवरात्र उत्सवाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना सांगणार आहेत. उत्सव साजरा करणाऱ्या देवस्थानचे प्रमुख व नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य यांनी बैठकीसाठी हजर राहावे, असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. शासनाकडून आलेल्या निर्देशांचे पालन नवरात्र उत्सव मंडळे व देवस्थानांनी करणे आवश्यक आहे. याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here