भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

0

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत एम. एस. नाईक फाऊंडेशन संचालित रत्नागिरी चाईल्ड लाईन १०९८, भाकर सेवा संस्था, लांजा आणि सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी यांचा संयुक्त विद्यमाने दि. २ ऑक्टोबर रोजी भाट्ये समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी भाट्ये समुद्रकिनारी असलेले प्लास्टिक, पाणी बॉटल, काचेच्या बॉटल, चप्पल आणि निर्माल्य संघटित करण्यात आले. तसेच लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सुद्धा पटवून देण्यात आले. यावेळी चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक अन्वी शिंदे, भाकर संस्थापक देवेंद्र पाटील, सचिव अश्विनी मोरे, संस्था चालक पवन मोरे, चाईल्ड सदस्य अवंतिका तिवरेकर, ऋषिकेश रहाटे, सौरभ पवार, रुपेश शिंदे, आशिष सावंत, अफ्रोझा तांबे, सखी वन स्टॉप संस्था सदस्य अंकिता चौगुले, बिना खातू, प्राची रसाळ, प्रेरणा सुर्वे, सुनील माने, मेघा विभुते, नंदा चौगुले आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here