शिवार-आंबेरे येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील शिवार-आंबेरे सांडमवाडी येथील सातपऱ्या नदीच्या पात्रात बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. घडली. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शांताराम गणू मोर्ये (६५, रा. शिवार आंबेरे मोर्येवाडी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत लक्ष्मण परशुराम रोकडे (६०, रा. शिवारआंबेरे लाखणवाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार शनिवारी सकाळी शांताराम मोर्ये हे शनिवारी सकाळी तेथील सातपऱ्या नदीच्या पात्रात शांताराम मोर्ये पाण्यात आढळून आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मुरकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here