उसने घेतेलेले पैसे व दागिने परत न केल्याने गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : आर्थिक संकटात असताना उसने घेतलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने परत न करता सहकाऱ्याची सुमारे १ लाख ६१ हजार ७४५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना डिसेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडली आहे. राम केशव यमगर (मुळ रा. आशानगर, सोलापूर सध्या रा.कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सुशांत सुनील जोशी (३४, रा. झाडगाव मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हे दोघेही सोबत काम करतात. २०१९ मध्ये राम यमगर हा आर्थिक संकटात असताना त्याने सुशांत जोशी यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले होते. परंतू २१ महिने पूर्ण होउनही रामने सुशांत जोशी यांनी दिलेली रक्कम व सोन्याचे दागिने परत केले नाहीत. दरम्यान सुशांत जोशी यांनी राम यमगरला फोन केले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देऊन फोन बंद करून ठेवला असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जोशी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here