गुहागरमधील चोरलेली दुचाकी संगमेश्वरमध्ये सापडली

0

गुहागर : ऐन गणेशोत्सव काळात ७ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत शृंगारतळी बाजारपेठेत पार्किंग केलेली मोटारसायकल संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी-खाचरवाडीतील संशयित चोरट्याने पळवून नेल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली. अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याच्या प्रकारानंतरच्या तक्रारीअंती स्पष्ट झाले आहे. या घटनेतील मोटारसायकल चोरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात असून संगमेश्वर व गुहागर पोलिसांतर्फे अधिक गतीने तपास सुरू आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अजित गुलाब शिंगाडे (वय ३० वर्षे) यांच्या गुहागर पोलिस ठाणेमधील फिर्यादीनुसार एम.एच-०८/ए.आर.३९६५ ही मोटरसायकल शृंगारतळी बाजारपेठेतील फुटपाथवर उभी (पार्किंग केलेली असता ७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ते ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान चोरीस गेल्याची नोंद गुहागर पोलिस ठाणेमध्ये झाली होती. संगमेश्वर तालुक्यातील राहणारा कळंबुशी-खाचरवाडी येथील राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने २० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वाजतादरम्यान संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची तक्रार संगमेश्वर पोलिस ठाणे मध्ये दाखल झाली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी केली असता चोरट्याकडे असणारी सुमारे २५ हजार रुपयाची मोटरसायकल गुहागरमधील असल्याची खात्री झाल्याची संगमेश्वर पोलिसांनी गुहागर पोलिसांना माहिती दिली. चोरटा पोलिसांनी ताब्यात घेऊन भादंवि कलम ३६३, ५११, ३५४ (ड)(१),५०६ नुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. गुहागर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए.एम. पवार हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here