चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात २१ पॅरा कमांडो विशेष दलाचा ३४वा वर्धापन दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. सैन्य दलातील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आलेले प्रसंग व त्या परिस्थितीत कुटुंबियांकडून मिळालेली अजोड साथ या सर्व आठवणींना उजाळा देत देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असलेले आजी-माजी सैनिकांचे सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबीय या आकस्मिक भेटीने सुखाहून गेले. यावेळी, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री, शौर्यचक्रप्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे, विकलांग सैनिक शामराज युवी, सुभेदार मधुकर पाटील, शहीद सैनिक सुधाकर भाट यांच्या पत्नी, १९७१चे वीरचक्रप्राप्त व चिपळूणचे कॅप्टन अर्जुन जाधव यांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
