डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये कशाची चाललेय लपवाछपवी ?

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुजरातमध्ये येणार असून त्यांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. ट्रम्प येणार म्हणून त्यांना मार्गातील झोपड्या दिसून नये म्हणून भिंतीचे कुंपणही तयार केले जात आहे. अहमदाबाद महापालिकेने हा भिंत उभारण्याचा निर्णय घेतला असून याचे कामही सुरू करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागामध्ये काही झोपड्या आहेत. या झोपड्या ट्रम्प यांना दिसून नयेत म्हणून महापालिकेने चक्क येथे भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे एक रोड शो करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गातील झोपड्या भिंतीमागे लपवण्यात येत आहे. याबाबत महापौर बिजल पटेल यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. डोनाल्ट ट्रम्प याचा हा दोन दिवसीय दौरा आहे. 24 फेब्रुवारीला ते गुजरातमध्ये येतील. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा दावा करण्यात येत आहे. यावेळी एक रोड शो देखील आयोजित करण्यात येईल अशी शक्यता असून त्याच अनुषंगाने अहमदाबाद महापालिकेने झोपड्या झाकण्यासाठी भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. सध्या जवळपास अर्धा किलोमीटर भिंतीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रगतिपथावर आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबच अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. मला अशा कोणत्याही बांधकामाबाबत माहिती नाही. मी असे कोणतेही बांधकाम पाहिले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here