बडोदा येथे भारतीय मराठा महासंघाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0

चिपळूण : भारतीय मराठा महासंघ संपूर्ण देशभरात बांधणी करणार असून, प्रत्येक राज्यात संघटना बांधली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच मराठा महासंघाचे गुजरात राज्य संपर्क अध्यक्ष सदानंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली बडोदा येथे मराठा महासंघाचे स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी बडोदा येथील प्रकाश यादव, श्री. पाटील, विकास भोईटे. कुणाल राणे, कोकिलाबेन पवार यांनी संघटना बांधणीसाठी मेहनत घेतली. दि. २६ सप्टेंबर रोजी बडोदा येथे हा मेळावा झाला. यावेळी सन्मान सोहळा देखील करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस राम शिदे, सचिव राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बन्सी डोके, प्रवक्ता राजन गावंड, कोकण प्रदेश अध्यक्ष सदानंद भोसले, शिवाजी पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बडोदामधील मराठी नागरिकांना संघटनेत सभासद करून घेण्यात आले व संघटना वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बडोद्यातील मराठा बांधव उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:20 PM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here