गुहागर किनाऱ्यावरील 20 व्यावसायिकांना बांधकामे हटविण्याच्या नोटीसा

0

गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविण्यात यावीत, अशी नोटीस महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सहाय्यक बंदर निरिक्षक यांनी सुमारे २० व्यावसायिकांना दिली आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योग बंद होता. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांवर आता शासन बुलडोझर फिरविण्याची तयारी करत आहे. असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पालशेत कार्यक्षेत्राच्या मौजे गुहागर येथील भूमापन क्र. २१४ मधील बंदर विभागाचे नावे असलेल्या जागेमध्ये केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, ही अतिक्रमणे मेरीटाईम कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता उभी केलेली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी यापूर्वी सूचना दिल्या होत्या. परंतु, अद्यापही आपण अतिक्रमणे काढलेली नाहीत. ही अतिक्रमणे/ दुकाने/स्टॉल उभारण्यासाठी आपण आपण मेरिटाई बोर्डाची परवानगी घेतेली नाही. त्यामुळे हे पत्र मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत अनधिकृतपणे उभारलेली दुकाने हटवून त्याखालील जागा त्वरित रिकामी करुन द्यावी. अन्यथा अतिक्रमण हटाव योजनेअंतर्गत ही अतिक्रमणे दूर करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. त्यासाठीच्या खर्चाची वसुली करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीला आपण जबाबदार असाल, अशा नोटीसा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरीक्षक, पालशेत यांनी पाठविल्या आहेत. या नोटिसांची एक प्रत प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, तहसीलदार गुहागर, नगराध्यक्ष गुहागर नगरपंचायत, पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. पर्यटन व्यवसायावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना या कारवाईमुळे पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:48 PM 05-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here