मनसेची खड्डे मोजा अनोखी स्‍पर्धा

0

पेण : मुंबई – गोवा महामार्गावरील वडखल ते पळस्पा या रस्त्यातील मोठ्‍या खड्‍ड्‍यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्‍या पार्श्वभूमीवर मनसेने या मार्गावर खड्डे मोजण्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले. या स्‍पर्धेला पेण तालुक्‍यातील वडखल येथून सुरूवात करण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रीय महामार्ग अभियंता गंगाधरण यांनी हे आंदोलन न करण्याची विनंती केली. यावर 25 ऑगस्टपर्यंत सर्व रास्ता पुन्हा डांबरीकरण करून पूर्ण करतो. अशी लेखी हमी त्‍यांनी दिल्‍यावर मनसेने खड्डे मोजा स्पर्धा आंदोलन तूर्त स्थगित केले. या आंदोलना प्रसंगी मनसे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, सरचिटणीस राहुल चव्हाण, पनवेल शहर उपाध्यक्ष संजय मीरकुटे. विद्यार्थी सेना अध्यक्ष शालोम पेणकर. पेनचे माजी सचिव मनोहर पाटील, अलिबाग अध्यक्ष देवव्रत पाटील, ग्राम सदस्य  विनोद गावंड, गौतम मोरे रफिक तडवी, निलेश भोपी, प्रदीप पंडित , चेतन चोगले, प्रफुल्ल साबळे, पवित्र पोलसानी  व सर्व रायगड जिल्हा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते हे या अनोख्या खड्‍डे मोजा आंदोलन स्‍पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामुळे 10 फूट लांब व 10 फूट रुंद तसेच 2 फूट उंची असलेल्‍या खड्ड्‍यांची यावेळी मोजदाद करण्यात आली. त्‍यामध्ये जवळजवळ १५ हजार ९२० जीवघेणे खड्डे रस्‍त्‍यांवर पडल्याचे या आंदोलनातून समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here