धनगर समाज आजही मागासलेला : प्रवीण काकडे

0

रत्नागिरी : भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षामध्येही डोंगर, दऱ्याखोऱ्यांत राहणारा धनगर समाज आजही विकासापासून वंचित राहिला आहे. तो मागासलेलादेखील आहे. परंतु आजही राजकीय पक्षांनी या समाजाला अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले. आपल्या समाजाने लाचारी आणि गुलामगिरी सोडली तरच समाजाची प्रगती होईल. समाजाने स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. काकडे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बोलत होते. काकडे यांनी लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यांची पाहणी केली. डोंगरदऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. ते म्हणाले, धनगर समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज दरीडोंगरातून वणवण भटकंती करीत आहे. गेली कित्येक वर्षे धनगर समाज सर्वच राजकीय पक्षांना मतदान करत आहेत. धनगर समाजाला प्रगती करायची असेल तर समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे, अशिक्षित बांधवांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. अहिल्यादेवी सामाजिक ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शिपोशी, सालपे, गोविळ, कावळटेक, वडाधार, विवली, गोविळ सगाआंबा, वरवडे, चाफे येथील धनगरवाडीत काकडे यांनी पायी दौरा केला. धनगरवाड्यांतील ११७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 05-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here