साळवी स्टॉप येथील फुटपाथवरचे गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही ‘रनप’कडून सुरू

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप-नाचणे मार्गावरील फुटपाथवरचे गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही ‘रनप’कडून सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. माळनाका येथील रनपच्या व्यायामशाळेच्या आवारात असलेल्या ट्रॅव्हल्स ऑफिसवरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. साळवीस्टॉप-नाचणे मार्गावर रत्नागिरी नगर परिषदेच्या फुटपाथवर बऱ्याच वर्षांपूर्वी गाळे सुरू करण्याची परवानगी दिली. या परवानगीची मुदत संपल्याने ते गाळे ताब्यात घेऊन नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. नगरसेवक राजन शेट्ये यांनी रनपचे उत्पन्न वाढवण्यासाठी साळवी स्टॉप येथील गाळ्यांचा विषय सभेत उपस्थित केला. माळनाका येथील ट्रॅव्हल्स ऑफिसबाबतही योग्य कार्यवाही करण्याची सूचना नगरसेविका स्मितल पावसकर यांनी केली. त्यानुसार विशेष सभेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. सोमवारी झालेल्या विशेष सभेत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचा ठरावही मंजूर झाला आहे. या ठरावानुसार रनपच्या मालकीचा एक गाळा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 06-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here