कुर्ली येथे मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल

0

रत्नागिरी : कुर्ली येथे रस्त्यावर अडवून मुलांना व त्यांच्या मित्राला मारहाण केल्याची तक्रार विकास तुकाराम चव्हाण रा. जेल रोड रत्नागिरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. राजन तोडणकर, विवेक तोडणकर, सुशांत तोडणकर, देवेंद्र तोडणकर, भाऊ तोडणकर, सागर तोडणकर, प्रसाद जगदीश तोडणकर यांनी फिर्यादी यांच्या मुलाची गाडी अडवून तुम्ही येथे येऊन दारू पिता, दंगा करता असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर सुशांत सुभाष तोडणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाबू चव्हाण याने आपल्या ताब्यातील चारचाकी गाडी बेदरकारपणे चालवीत फिर्यादी सुशांत तोडणकर व त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक देवेंद्र सुधाकर तोडणकर याना दुखापत करून शिवीगाळ करीत धमकी दिल्याची तक्रार सुशांत तोडणकर यांनी पोलीस स्थानकात दिली आहे. या दोन्ही तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उप निरीक्षक साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 06/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here