दापोलीतील अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

0

दापोली : तालुक्यातील वेळवी येथे झालेल्या अपघातातील दुचाकीस्वाराचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दापोली पोलिस ठाण्यात मंगळवारी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक विनायक टापरे (वय २४, रा. वेळवी) याचा १६ ऑगस्ट २०२१ रोजी वेळवी येथे दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला दापोली शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी आठच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शून्य क्रमांकाने ही घटना दापोली पोलिस ठाण्यात ५ ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बुरटे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 06-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here