राजापुरातून चोरीला गेलेली दुचाकी सापडली कणकवलीत

0

राजापूर : काही दिवसांपूर्वी राजापूर शहरातून भर दिवसा चोरीला गेलेली दुचाकी कणकवली शहरापासून अठरा कि.मी.वर असलेल्या सांगवे येथे बेवारसरीत्या आढळून आली. दरम्यान, कणकवली पोलिसांनी ही दुचाकी राजापूर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील शेंबवणे गावचे रहिवासी सत्तेश पवार हे राजापूर बाजारपेठेत काही कामानिमित्त आले होते. शहरातील अर्बन बँकेजवळ आपली दुचाकी(एम.एच.आठ.एयू.५५२७) पार्क करुन ते कामासाठी चालले होते त्यावेळी चुकून दुचाकीची चावी न्यायला ते विसरले होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोघा अज्ञातांनी ती संधी साधून चोरून पोबारा केला होता. या नंतर आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पवार यांनी राजापूर पोलिसांत दिली होती. त्यानुसार नोंद करून पोलिस तपास करीत होते. कणकवली शहरापासून सुमारे १८ कि. मी. अंतरावर असलेल्या सांगवे गावातील एका पुलाजवळ ही दुचाकी बेवारस आढळून आली होती. अधिक माहितीअंती ती दुचाकी राजापुरातून चोरीला गेली असल्याचे कणकवली पोलिसांच्या निदर्शनाला आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 06-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here