श्री संप्रदायतर्फे शिरवली गावात स्वच्छता अभियान

0

खेड : श्री संप्रदाय खेड समितीच्या वतीने रविवार दि. ३ रोजी तालुक्यातील शिरवली या गावी नाणीज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात दोनशे सेवेकरी उपस्थित होते. शिरवली गावचे सरपंच श्री. कुळे, उपसरपंच श्री. बोलाडे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, अशोक चिटणीस, सचिन चिटणीस आदींच्या उपस्थितीत श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाला सुरवात केली. यावेळी मुख्य पीठ युवा निरीक्षक अविनाश जागुष्टे, मुख्य पीठ धर्मक्षेत्र प्रमुख दत्तात्रय मोरे, दक्षिण रायगडचे निरीक्षक सुनील वीर, युवाध्यक्ष सौरभ चाळके, सामाजिक उपक्रम प्रमुख विलास बेंद्रे, सेवाध्यक्ष दगडू नेवरे, उपक्रम प्रमुख मधुकर डाऊल आदी उपस्थित होते. अभियानाला सकाळी ९ वाजता सत्संगाने सुरवात झाली. शिरवली गावातील ग्रामदैवत परिसर, शाळा, हायस्कुल परिसर, वाडीतून जाणाऱ्या पायवाटा, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, रस्ते सर्व साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले. शेवटी गुरू माऊलींच्या नामघोषाने अभियानाची सांगता झाली. सूत्रसंचालन बेंद्रे यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 06-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here