जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली ही केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी झाल्याचा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आणि त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. एक कार्यक्षम अभ्यासू आणि संवेदनशील मराठी अधिकारी चव्हाण यांच्या रूपाने येथील जनतेला अनुभवयास मिळाला. ते सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून वागणारे उच्चपदस्थ अधिकारी होते. रात्री उशिरा कधीही आणि कुणीही फोन केला तरी त्याचे म्हणणे ऐकन घेणारा अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याने गमावला आहे. मराठी अधिकाऱ्यांस आणि येथील जनतेच्या हितास आणि जिल्ह्याच्या विकासास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेऊन आपण सुनील चव्हाण यांची बदली रद्द करण्याची मागणी कर असल्याचे त्यांनी सांगितले.
